ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री क्षेत्र खोटले येथे २३ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रगट दिन, पालखी सोहळा उत्सव
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री क्षेत्र खोटले येथे २३ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रगट दिन, पालखी सोहळा उत्सव

प्रकाशन: 21 Mar 2023 05:50 PM
वाचन संख्या 40

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मालवण तालुक्यातील कसाल पासून 7 किमी अंतरावर श्री क्षेत्र खोटले येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन उत्सव २३ मार्च रोजी भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. पुणे, मुबई, बेळगांव, गोवा, कोल्हापूर, सांगली येथुन भविक दरवर्षी येतात.पहाटे ५.३० वा. काकड आरती, नित्योपासना,सकाळी ७ वा. नामधारक सौ व श्री विजय परब हे हरिपाठ करणार आहेत.सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजादुपारी १२.३० महाआरती, महाभोगदुपारी २ वा. कुंकूमार्चनआणि दुपारी 4४ ते ६ वा. पालखी सोहळाश्रद्धास्थान, तळेवाडी ते खोटले गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर पर्यंत परतीची पालखी परिक्रमा असणार आहे. या वर्षी प्रामुख्याने श्री रामेश्वर ढोल पथक, मुटाट देवगडश्री रवळनाथ पारंपरिक वाद्य वृंद, खोटलेश्री जयंतीदेवी प्रा. दिंडी पथक, पळसंब ,मालवणश्री रंगदेवता दिंडी पथक ओवळीये, मालवण आई माऊली ढोलपथक, चेंदवन, कुडाळश्री गांगेश्वर दिंडी पथक हिवाळे, मालवणश्री कलेश्वर चित्ररथ, नेरूर, कुडाळश्री स्वामी समर्थ दिंडी पथक, वांयगवडे ,मालवणश्री नवलाई ढोलपथक, दाभोळे, देवगडसखी महिला फुगडी पथक, पावशी कुडाळस्वराज्य महिला ढोलपथक, मालवणहे पालखीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. भाविकांना मोफत कोकम सरबत सेवा श्री महापुरुष भजन मंडळ, मधलीवाडी खोटले देणार आहेतपालखी सोहळा नंतर ७ वाजता कौतुक सोहळा , संध्या ७.३० ते रात्री १० महाप्रसादरात्री ९ ते ९.३० प्राथमिक शिक्षक कलामंच, गायक श्री राजेश गुरव(संगीत विशारद) यांचा भक्ती गायनाचा कार्यक्रम,रात्री १० वा.चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवन श्री देवेंद्र नाईक प्रस्तुत गौरी स्वयंवर हे पौराणिक नाटक होणार आहेरात्री २ ते पहाटे ५.३० पर्यंत नामाचा जागर होणार आहे.तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेणे, असे श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले यांचे कडून आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स