ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बँक ऑफ इंडियाच्या वतीने बांदा केंद्रशाळेतील पाच विद्यार्थिनींना धनादेश वितरण..

बँक ऑफ इंडियाच्या वतीने बांदा केंद्रशाळेतील पाच विद्यार्थिनींना धनादेश वितरण..

प्रकाशन: 02 Oct 2021 12:51 PM
वाचन संख्या 98

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजने अंतर्गत झालेला उपक्रम…

बांदा |राकेश परब : बँक आॉफ इंडियाच्या ११६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बेटी बचाओ बेटी पढा़ओ या उपक्रमांतर्गत बांदा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील पाच विद्यार्थीनींना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
१ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत बँक आँफ इंडियाच्या वतीने वर्धापन सप्ताह साजरा केला जात असून बांदा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं .१ येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर ,पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ,बँक आँफ इंडिया बांदा शाखेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक अंकित धवन,प्रबंधक बाबजी बिचाला,कॅशियर बाळकुष्ण नाहावी ,मुख्याध्यापक सरोज नाईक ,शाळा व्यवस्थापन सदस्य संतोष बांदेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशाळेतील विद्यार्थीनी आदिती सावंत,ईशा गवळी,युगा सावंत ,पूर्वी मांजरेकर,युतिका बांदेकर या विद्यार्थींनीना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ शाखा प्रबंधक अंकित धवन यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती समजावून सांगितली सभासदांनी विविव योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद श्वेता कोरगावकर यांनी बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले,शितल राऊळ यांनी बांदा शाळेसाठी विविध योजनाचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले सरपंच अक्रम खान यांनी बांदा शाळेसाठी मिळत असलेल्या योगदानाबद्दल सर्व दात्यांचे आभार मानले . यावेळी मुख्य शाखा प्रबंधक अंकित धवन यांनी शाळेसाठी शोभिवंत फुलझाडे व कुंडया भेट दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सरोज नाईक यांनी केले.सूत्रसंचालन श्री जे.डी.पाटील यांनी केले तर आभार शुभेच्छा सावंत यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स