ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रोटरी क्लब माहीम यांच्या सौजन्याने बांदा केंद्रशाळेच्या वर्गखोल्यांच्या सिलिंगसाठी आर्थिक सहाय्य.

रोटरी क्लब माहीम यांच्या सौजन्याने बांदा केंद्रशाळेच्या वर्गखोल्यांच्या सिलिंगसाठी आर्थिक सहाय्य.

प्रकाशन: 02 Oct 2021 12:43 PM
वाचन संख्या 76

दिड वर्षात बांदा केंद्रशाळेत लाॅकडाऊन कालावधीत चार लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव लोकसहभागातून…!

बांदा | राकेश परब : जिल्हा परिषद बांदा नं १ केंद्रशाळेत लाॉकडाऊन कालावधीत राबविण्यात आलेले वैशिष्टपूर्ण उपक्रम व यावर्षी आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे शाळेच्या शाळेच्या भौतिक गरजा पूर्ततेसाठी दोन वर्गखोल्यांचे सिलींग करणेकरीता रोटरी क्लब मुंबई माहिम यांचेकडून ६५ हजार रुपयांचा आर्थिक मदतनिधी शाळेसाठी प्राप्त झाला.
या कामकाकजाची सुरूवात मान्यवरांच्या उपस्थित नुकतीच सुरवात करण्यात आली तंटामुक्त अध्यक्ष गुरुनाथ सावंत शुभहस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,केंद्रप्रमुख संदीप गवस,मुख्याध्यापिका सरोज नाईक,गजाजन सावंत मोर्ये,श्रद्धा नार्वेकर,प्रवीण गाड, माधवी गाड ,ठेकेदार अनिश शहा ,वंदना शितोळे ,श्रीमती जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
गेल्या दिड वर्षात बांदा केंद्रशाळेत लाॅकडाऊन कालावधीत चार लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव लोकसहभागातून करण्यात आला आहे.रोटरी क्लब माहिम यांनी शाळेसाठी दिलेल्या या योगदानाबद्दल उपस्थित मान्यरांच्या वतीने आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.डी.पाटील यांनी केले तर आभार उपशिक्षक रंगनाथ परब यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स