ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
यशस्विनी प्रतिष्ठानचामुणगेत रंगला खेळ पैठणीचा!सौ.कोमल सारंग,सौ. सुजाता परब पैठणीच्या मानकरी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

यशस्विनी प्रतिष्ठानचामुणगेत रंगला खेळ पैठणीचा!सौ.कोमल सारंग,सौ. सुजाता परब पैठणीच्या मानकरी

प्रकाशन: 17 Mar 2023 05:51 PM
वाचन संख्या 42

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिलानि एकत्र येऊन त्यांच्या मधील आत्मविश्वास वाढवा. एकोप्याची भावना जागृत व्हावी या दृष्टिकोनातून मुणगे येथे महिला मेळावा तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आडबंदरचे सुपुत्र आणि यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.आनंद मालाडकर आणि प्रभाग क्रमांक एक सदस्या सौ.रवीना मालाडकर,सौ.अंजली सावंत, ग्रा सदस्य तथा माजी उपसरपंच श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ.सायली बागवे यांचा अथक प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी आयोजित स्पर्धांचे परीक्षण सौ.कामिनी ढेकणे आणि सौ.विद्या ढेकणे यांनी केले. आडबंदर वाडी पैठणीचा मानकरी सौ.कोमल सारंग, सोन्याची नथ मानकरी श्रीमती.सुलोचनाआडकर,उत्तेजनार्थ मानकरीसौ. दिशा तळवडकर,सौ. मनस्वी जोशी, सौ.लीना आडकर यांना गौरवण्यात आले. खेळ पैठणीचा कार्यक्रम श्रीमती रूपा मालाडकर यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता.आपई वाडीतील पैठणीचा मानकरी सौ. सुजाता परब आणि सोन्याची नथ श्रीमती.सत्यवती परब, उत्तेजनार्थ मानकरी सौ.अंजली सावंत,सौ.वैभवी .परब,सौ.सविता महाजन याना गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या स्थानिक ग्रा सदस्या, माजी उपसरपंच, माजी सरपंच,परीक्षक,सर्व विजेत्या महिला स्पर्धक, खेळात सहभागी झालेल्या सर्व महिला वर्गाचे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मिञ मंडळाचा वत्तीने श्री.आनंद मालाडकर यांनी मनापासून आभार मानत सर्वाचे अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स