ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दर्पण प्रबोधिनी तर्फे 19 मार्च रोजी धम्म प्रबोधन!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दर्पण प्रबोधिनी तर्फे 19 मार्च रोजी धम्म प्रबोधन!

प्रकाशन: 17 Mar 2023 05:30 PM
वाचन संख्या 32

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने धम्म जागृती अभियानांतर्गत रविवार, १९ मार्च रोजी सकाळी ११ वा. धम्म प्रबोधनाचे आयोजन शिवडाव बौद्धवाडी येथे करण्यात आले आहे. धम्म चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी, साध्यासोप्या भाषेत बुद्धधम्माची आजच्या काळातील गरज लक्षात घेवून प्रबोधनात्मक यथार्थ मांडणी करणारे हे प्रबोधन असणार आहे.दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून ‘सध्दम्माची समकालीन प्रस्तुती’ याविषयावर प्रा. डॉ. अमर कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला विद्रोही कवी, ज्येष्ठ निवेदक राजेश कदम, दर्पण प्रबोधिनीचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, प्रज्ञा कदम, सहसचिव संदेश कदम, दर्पण महिला फ्रंटच्या अध्यक्षा स्नेहल तांबे, उपाध्यक्षा संजना तांबे, शिवडाव बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष सचिन तांबे, शिवडाव बौद्ध अध्यक्ष तारक तांबे यांच्यासह दर्पण कार्यकारिणी व सदस्य, सल्लागार, दर्पण महिला विकास मंडळ गाव शाखेचे, दर्पण स्टुडंट फ्रेडरेशन आदी उपस्थितीत राहणारया कार्यक्रमाला परिवर्तनशिल चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दर्पण प्रबोधिनीचे सचिव सुभाष कदम यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स