गोळवण खालची गावडेवाडी रस्ता कामाचा शुभारंभ!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर गोळवण खालची गावडेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचा भुमीपुजन कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष श्री. अशोक सावंत यांच्या मातोश्री श्रीम. सुलोचना वासुदेव सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका असाच पुढे चालू राहील असे यावेळी सरपंच सुभाष लाड म्हणाले. सदर कार्यक्रमास ग्रा. पं. सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, घुमडे उपसरपंच राजू सावंत, ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, श्री. विरेश पवार, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, तसेच ग्रामस्थ श्री. भाई चिरमुले, श्री. मुरारी गावडे, श्री. सुनिल गावडे, श्री. सुरेश गावडे, श्री. दिपक गावडे, श्री. एकनाथ गावडे, श्री. गोपाळ गावडे, श्री. विनायक गावडे, श्री. दिगंबर गावडे, श्री. हरिश्चंद्र गावडे, श्री. वासुदेव गावडे, श्री. सदानंद गावडे, श्री. कृष्णा गावडे, श्री. प्रभाकर गावडे, श्री. मनोहर गावडे-डिकवल, ग्रा. पं. कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्री. रामकृष्ण नाईक, श्रीम. करुणा राणे, श्री. दत्ताराम परब आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)