ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा आनंदी मंगल कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा आनंदी मंगल कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

प्रकाशन: 17 Mar 2023 02:40 PM
वाचन संख्या 98

बांदा रोटरी क्लब च्या माध्यमातून मोफत औषध वाटप होणार* बांदा रो.अध्यक्ष मंदार कल्याणकर

बांदा /राकेश परब: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था कडशी-मोपा व रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १९ रोजी येथील आनंदी मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले आहे. सदर शिबिरात रुग्णांना मोफत औषधे बांदा रोटरी क्लबच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार असल्याची माहिती रोटरीचे बांदा अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी येथे आयोजित आनंदी मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. या आरोग्य शिबिरात हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, लिव्हर व किडनी विकार, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, हाडांचे व संध्या्यांचे आजार, पक्षाघात, वात विकार, मूळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग तसेच अन्य जुनात विकार अशा अनेक रोगांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आहार विहार व योग संदर्भात माहिती देखील देण्यात येणार आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. रुग्णांच्या प्राथमिक निदानसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या माध्यमातून दिनांक १६, १७ व १८ रोजी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत रक्त तपासणी सकाळी ९ ते ११ या वेळेत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या होणार असल्याने मुख्य आरोग्य शिबिरापूर्वी रुग्णांनी रक्त तपासणी शिबिराचा देखील लाभ घ्यावा. या शिबिरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांनच्या अधिष्ठाता तथा स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. सुजाता कदम, चिकित्सक डॉ. प्रशांत ससाणे, पंचकर्म तज्ञ डॉ. स्वप्नीत चौधरी, शरीर रचना तज्ञ डॉ. थ्रीगीत के., शल्य चिकित्सक डॉ. फोरम जोशी, स्त्रीरोग प्रसूती तज्ञ डॉ. दीपा शिरोडकर, योगा थेरपीस्ट डॉ. मोहिनी मेती, औषध निर्माता भक्ती चव्हाण, परिचारिका प्रिया पेडणेकर, सिद्धेश आईर हे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून रुग्णांना सेवा देणार आहेत. बांदा येथील शिबीर संपन्न झाल्यानंतर २६ मार्च रोजी जिल्हा परिषद केंद्रशाळा सभागृह इन्सुली व २ एप्रिल रोजी नेतर्डे येथे हे मोफत शिबीर होणार आहे. या दोन्ही शिबिराच्या दोन दिवस पूर्वी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र बांदाच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी शिबीर देखील होणार आहे. बांदा शिबिराच्या प्रमुखपदी आपा चिंदरकर, इन्सुली शिबीर प्रमुखपदी स्वागत नाटेकर, नेतर्डे शिबीर प्रमुखपदी आबा धारगळकर व प्रमोद कामत यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, सचिव फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, आपा चिंदरकर, दिलीप कोरगावकर, सुदन केसरकर, स्वागत नाटेकर, आबा धारगळकर, सिद्धेश पावसकर, शिवानंद भिडे, मनसूख पटेल, सुधीर शिरसाट, संजय शिरोडकर, अक्षय मयेकर, श्री. परुळेकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स