ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
क्रिएटिव्ह सखी ग्रुपतर्फे जागतिक महीला दिनाच्या निमित्ताने बांद्यातील महिलांचा सत्कार कार्यक्रम
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

क्रिएटिव्ह सखी ग्रुपतर्फे जागतिक महीला दिनाच्या निमित्ताने बांद्यातील महिलांचा सत्कार कार्यक्रम

प्रकाशन: 16 Mar 2023 08:32 PM
वाचन संख्या 29

बांदा / राकेश परब : स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात काहीतरी करून दाखवावे. समाजातील विविध घटकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ही जेव्हा ध्येय बनते आणि सातत्याने त्या दिशेनेच प्रत्येक पाऊल टाकले जाते, तेव्हा असे कार्य समाजाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शन ठरते, असे प्रतिपादन सरपंच प्रियांका नाईक यांनी क्रीएटिव्ह सखी ग्रुप च्या कार्यक्रम बोलताना सांगितले.

समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिकमहिला दिनाचे औचित्य साधून येथील क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्यावतीने करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्रीमती नाईक बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर तलाठी वर्षा नाडकर्णी, जिल्हा परिषद माजी सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा मराठा समाज महिला मंडळ अध्यक्षा स्वाती सावंत, दैवज्ञ समाज महिला मंडळ अध्यक्षा धनश्री धारगळकर, पाटेश्वर महिला मंडळ अध्यक्षा प्रियांका हरमलकर, सेवानिवृत्त शिक्षिका गीता गर्दे, सखी ग्रुपच्या अध्यक्षा अंकिता आदी उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलन व केक कापून महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रह उद्योग करणाऱ्या मीना नाटेकर, उमांगी मयेकर, साक्षी वाळके, मंजू साळगावकर, विप्रा सावंत, प्रियांका नाटेकर, चित्रा भिसे, शांभवी गायतोंडे, मानसी मयेकर, सरोज येडवे, शैक्षणिक क्षेत्रातील भक्ती महाजन, रिना मोरजकर, स्नेहा पावसकर, अभिनय क्षेत्रातील गौरी बांदेकर, अवंती पंडित, रुपाली सावंत, प्लास्टिक वापर टाळणाऱ्या गायत्री भांगले. मराठी सिने. मालिका अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर.. घरकाम करणाऱ्या सुनिता मुळ्ये व रेणुका वडार, सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्या शिल्पा परब, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, रिया येडवे, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी पटेकर, रुपाली शिरसाट, देवल येडवे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

वर्षा नाडकर्णी म्हणाल्या की, जागतिक महिला दिनामुळे आज आपल्याला महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत, हे प्रकर्षाने दिसून येते. मात्र, हे केवळ एक दिवसापुरते सीमित न राहता दररोज महिलांच्या कर्तृत्वाला वाव दिला पाहिजे. यावेळी श्वेता कोरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात रिया वाळके यांनी महिलांसाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून मंडळाच्या दशकपूर्तीनिमित्त स्थानिक महिलांना व्यासपीठ निर्माण होण्यासाठी ‘सौभाग्यवती सुंदरी २०२३ स्पर्धा घेण्यात येणार असे सांगितले. आभार रुपाली शिरसाट यांनी मानले. यावेळी मंडळाच्या सौ.चित्रा भिसे, वंदना पावसकर, साधना पांगम, सिंधिया पावसकर, सपना विरनोडकर, निनता गोवेकर, सोनाली राणे, सावली कामत, श्रीया गोवेकर, तन्वी काणेकर, जयश्री गोवेकर, सिद्धी पावसकर, श्रुती गोवेकर, सायली विरनोडकर, मृणाल तोरसकर, रेश्मा राजगुरू, माधुरी पावसकर,उपस्थित होत्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स