ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा येथील स्वच्छतागृह त्वरीत सुरू करा ठाकरे शिवसेना अल्पसंख्याक सावंतवाडी तालुका अध्यक्ष रियाज खान
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा येथील स्वच्छतागृह त्वरीत सुरू करा ठाकरे शिवसेना अल्पसंख्याक सावंतवाडी तालुका अध्यक्ष रियाज खान

प्रकाशन: 16 Mar 2023 08:24 PM
वाचन संख्या 34

बांदा /राकेश परब : बांदा बसस्थानकांत बांधण्यात आलेले स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी एक महिन्यापूर्वी ठाकरे सेना अल्पसंख्याक सावंतवाडी तालुका अध्यक्ष रियाज खान यांनी कार्यकर्त्यासह बांदा बसस्थानकात धडक देत जाब विचारला असता आठ दिवसामध्ये सुरू करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

बांदा बसस्थानकात प्रवासी, विद्यार्थी,रिक्षाचालक, परिसरातील दुकानदार यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आज परत रियाज खान यांनी कार्यकर्ते,ग्रामस्थ,प्रवाशी यांना घेऊन बांदा बसस्थानकात धडक देत वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना धारेवर धरत जाब विचारला. प्रकाश नार्वेकर यांनी दूरध्वनीवरून विभागीय अभियंता श्री.केकरे यांच्याशी संपर्क साधून खान यांना दिला. रियाज खान यांनी केकरे यांनी स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्वाणीचा ईशारा दिला. एस.टी.महामंडळाच्या प्रशासनाचा अंधाधुद कारभाराच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स