वेंगुर्ले एस् .टी.डेपोत लवकरच भाजपाची कामगार संघटना ; चालक - वाहक यांनी भाजपा कार्यालयात भेट देऊन केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले एस टी डेपोत लवकरच भाजपाची कामगार संघटना स्थापन होणार आहे.
एस टी कर्मचारी वर्गाच्या सर्व समस्यांसाठी तसेच त्यांच्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच भाजपाची कामगार संघटना वेंगुर्ले डेपोमध्ये स्थापन करावी यासाठी वेंगुर्ले डेपोतील चालक व वाहक यांनी भाजपा कार्यालयात भेट घेऊन तशी मागणी केली .
एस. टी.कामगारांच्या राज्यव्यापी संपकाळात भाजपा च्या वतीने आम. गोपीचंद पडळकर व आम. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आंदोलन करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला होता त्यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये भाजप पक्षाकडून अपेक्षा निर्माण झाली असल्याने सर्व कामगार भाजपाच्या झेंड्याखाली काम करण्यास उत्सुक असल्याचे भेट दिलेल्या कर्मचारी वर्गाने सांगितले.
यावेळी भाजपा कार्यालयात जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, सरपंच संघटनेचे पपु परब तसेच एस्.टी.कर्मचारी भरत सिताराम चव्हाण, दाजी तळवणेकर, महादेव भगत, मनोहर वालावलकर, मिलिंद मयेकर, सखाराम सावळ, तेजस जोशी, प्रशांत गावडे, रोशन तेंडोलकर इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)