ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर गांवच्या शिमगोत्सवाच्या खेळाची उत्साहात सांगता ; भगवती उत्साही मंडळाचा सक्रिय सहभाग.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर गांवच्या शिमगोत्सवाच्या खेळाची उत्साहात सांगता ; भगवती उत्साही मंडळाचा सक्रिय सहभाग.

प्रकाशन: 12 Mar 2023 02:56 PM
वाचन संख्या 495

भगवती उत्साही मंडळ नाचांच्या पैशातून राबवते विविधांगी उपक्रम.

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गावातील भगवती उत्साही मंडळ हे समाजोपयोगी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. ‘शिमगोत्सव’ हा संपूर्ण कोकणात जल्लोषात साजरा करण्यात येणारा मोठा सण. देव देवतांची पालखी, गोमुचा खेळ,नाच, संकासुर यांनी गावे दुमदुमत असतात. कोकणातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळा खेळ खेळला जातो. सिंधुदुर्ग व गोव्यात ‘गोमूचो नाच’ सादर करण्याची प्रथा आहे. बाळगोपाळ मंडळी स्री वेश परिधान, कृष्ण, हनुमान विविध पात्रे तयार करुन घरोघरी गवळण, कोळी गिते म्हणत घरोघरी फिरतात.

चिंदर गावातील ‘भगवती उत्साही मंडळ’ अशा प्रथा अनेक वर्षे जपत आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून ते विविधांगी उपक्रम नेहमी राबवत असतात. यंदाही शिमगोत्सवाच्या खेळाची उत्साहाने सांगता झाली. यावेळी या गोमूच्या नाचात, राज शेडगे, धनंजय नाटेकर, ऋतिक शेडगे, देवेंद्र कांबळी, विवेक कांबळी, राज परब, कुंदन नाटेकर, गणेश परब, निखिल परब, यज्ञेश पाटणकर यांनी विविध भूमिका निभावल्या तर संदिप परब व पिंट्या दळवी यांनी हार्मोनियम व तबला साथ केली. मंडळाच्या उपक्रमा बाबत सर्वस्तरातून नेहमी कौतुक होत असते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स