ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांद्यात पूरग्रस्त व्यापा-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी...

बांद्यात पूरग्रस्त व्यापा-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी...

प्रकाशन: 02 Oct 2021 12:11 PM
वाचन संख्या 156

सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी सचिन नाटेकर यांचे सडेतोड मत

बांदा |राकेश परब : बांदा परिसरात महापुर येऊन दोन महिने उलटून गेले तरी व्यापारी मदतीपासून वंचितच असल्याचे व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते सचिन नाटेकर यांनी म्हटले आहे तसेच नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, व जिल्हा पालकमंत्री यांनी त्वरीत दखल घेऊन जाहीर मदतव्यापाऱ्यांना अदा करावी अशी मागणी सचिन नाटेकर यांनी केली आहे. आत्मनिर्भर असलेला कोकणी व्यापारी सततची अतिवृष्टी,करोना महामारी, लाँकडाऊन यामुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. ३० सप्टेंबर पर्यंत जाहीर केलेली मदत अदा करावी.अतिवृष्टी व महापुर आल्यावर राज्याच्या अनेक मंत्र्यांचे पहाणी दौरे कोकणात झाले.आश्वासनांचा महापुर आला असल्य‍‍ाचे नाटेकर यांनी दिलेल्या प्रसिद्द पत्रकात म्हटले आहे. पुढे नाटेकर यांनी असे म्हटले आहे की, मुख्यमंत्रीनी तर मी पँकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसुन प्रत्यक्षात मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षाचे दिग्गज नेतेही आपल्या कार्यकर्ते च्या फोजफाट्यासह कोकणात आले. सरकार वर टिकेची झोड उठवली.सरकार ला मदत देण्यास भाग पाडू असे सांगितले.जसा महापुर ओसरला तसा सरकार व विरोधी पक्षांनी दिलेल्या आश्वासनांचा महापुरही ओसरला. प्रत्यक्षात व्यापारी च्या पदरात काहीच पडले नसल्याचे त्यांनी सांगितले. आता लवकरात लवकर व्यापारी ना मदत द्या. अन्यथा आंदोलन करणारा असा आक्रमक पवित्रा घेत नाटेकर यांनी बांदा व्यापा-यांच्या वतीने कडक इशार दिला आहे. २०१९ व २०२१ चा महापुर, कोरोना महामारी, सततचे लाँकडाऊन यामुळे कोकणातील व्यापारी चे कंबरडे मोडले आहे.
व्यापारी बांधवाना पक्षीय राजकारणात स्वास्थ नाही. तरीही. सरकार ला वेळ मिळाल्यास व्यापारी, कष्टकरी, शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा. सरकार कडून व्यापारी च्या काही माफक अपेक्षा असल्याचे नाटेकर यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स