रोटरी क्लब ऑफ बाँम्बे सी-कोस्ट व बॅ.नाथ पै सेवांगण यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप.
पूरग्रस्तांसाठीही संस्थेने केली होती मदत
बांदा : राकेश परब : बॅरीस्टर नाथ पै सेवांगण मालवण (कट्टा) यांच्यावतीने नेहमी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. मध्यंतरीच्या पूरपरिस्थितीमध्ये संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरग्रस्तांसाठी अनेक प्रकारची मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे नुकतेच विविध भागात शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी-कोस्ट यांच्या विद्यमाने हे वाटप करण्यात आले. विलवडे येथे १५ मुलांना या शालेय साहित्याचे वाटप संस्थेच्या मार्फत करण्यात आले.
यावेळी बॅ. नाथ पै सेवांगाणाचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, सौ. प्रियांका भोगटे, बाळकृष्ण जोंधळी, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष सोनू दळवी, मुख्याध्यापिका श्री. सुप्रिया सावंत, शिक्षक मनोहन गवस, दिपाली निकम, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दत्ताराम परब, विलास दळवी, सुरेश सावंत, सुजिता सावंत आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केल्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी संस्थेचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)