ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नाभिक महिलांनो सबल व्हा : कल्पना मलये कणकवली तालुका नाभिक संघटनेचा महिला मेळावा संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नाभिक महिलांनो सबल व्हा : कल्पना मलये कणकवली तालुका नाभिक संघटनेचा महिला मेळावा संपन्न

प्रकाशन: 09 Mar 2023 10:26 PM
वाचन संख्या 127

ब्यूरो चिफ-विवेक परब- सावित्रीबाई फुलेंनी त्या काळात परिस्थितीशी सामना दिला होता. नाभिक महिलांनो, आता जागृत व्हा, सबल बना, असे प्रतिपादन लेखिका व कवयित्री कल्पना मलये यांनी कणकवली नाभिक महिला मेळाव्यात केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी कणकवली नाभिक संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने ‘महिला मेळावा’ घेण्यात येतो. यावर्षीही जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या कणकवली येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात मेळावा संपन्न झाला.

संत सेना महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. कणकवली शहर महिलांनी ईश्वस्तवन सादर केले. सातरल महिला मंडळाने सुमधुर स्वागतगीत सादर केले.

तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. महिला आघाडीच्या वतीने सर्व उपस्थित पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले. कवयित्री व लेखिका कल्पना मलये यांनी सर्व मुलींना , युवतींना व महिलांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. संघटनेच्या वतीने मलये यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल व कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण यांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कुडाळ तालुक्यातील जुही शेर्लेकर यांनी तरुणींनी स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी आवाहन केले.

चैत्रा चव्हाण, हर्षाली चव्हाण, स्वानंदी कुबल, तनिष्का कुबल, प्रदिप्ती कुबल, शमिका चव्हाण, तन्वी चव्हाण, प्रतिक्षा चव्हाण यांनी सुंदर नृत्ये सादर केली. सर्व नृत्यांगणांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

संगीतखुर्चीमध्ये चंदा चव्हाण प्रथम, संजना चव्हाण द्वितीय आल्या. त्यांना भेटवस्तू देण्यात आली. शेवटपर्यंत उपस्थित राहिलेल्या पाच भाग्यवान विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर व माजी कणकवली महिला तालुकाध्यक्षा संजना चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सचिव सुधीर चव्हाण, जिल्हा सदस्य रुपेश पिंगुळकर, रचना चव्हाण, सुभाष चव्हाण, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गणेश चव्हाण, उपाध्यक्षा रसिका आचरेकर, कोषाध्यक्षा अभिलाषा शिंदे, तालुका सल्लागार भक्ती चव्हाण, महिला सचिव हेमांगी अणावकर, सहसचिव ईश्वरी कुबल, दशरथ चव्हाण, रोशन चव्हाण, नंदकुमार चव्हाण, विलास चव्हाण, तालुका खजिनदार रमेश आचरेकर, संजय कुबल, निलेश चव्हाण आणि बहुसंख्य महिला व पुरुष सदस्य उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स