ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रंगीत धाग्यांनी साकारले छत्रपती  शिवराय.....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रंगीत धाग्यांनी साकारले छत्रपती शिवराय.....!

प्रकाशन: 09 Mar 2023 10:21 PM
वाचन संख्या 83

वराडकर हायस्कूलच्या श्रेया चांदरकर हिची अप्रतिम कलाकृती

ब्यूरो चिफ/विवेक परब-तिथीप्रमाणे साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कु. श्रेया समीर चांदरकर हिने एक एक धागा जोडत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा भारतभर विविध रूपामध्ये साकारल्या गेल्या. काहींनी भव्य रांगोळ्या मधून, पेंटिंग मधून, कोलाज चित्रांच्या माध्यमातून तर प्रत्यक्ष शेतामध्ये छत्रपती शिवरायांचे रूप साकारले .

परंतु एखाद्या शाळकरी मुलीने विविध रंगीत दोऱ्यांच्या सहाय्याने विणलेले छत्रपती शिवरायांचे चित्र सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले असावे. जवळपास पाच दिवस अथक परिश्रम घेत तिने हे चित्र पूर्ण केले.

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा असल्यामुळे शाळा एक वेळ भरते. घरी लवकर आल्यामुळे तिने या वेळेचा सदुपयोग करत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. यासाठी जवळपास 100 विविध रंगांच्या दोऱ्यांचा वापर तिने केला. यासाठी तीला वडील व कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स