ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लाॕ काॕलेजचा जनताभिमुख उपक्रम -सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात वराड या गावी जाऊन  काॕलेजच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लाॕ काॕलेजचा जनताभिमुख उपक्रम -सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात वराड या गावी जाऊन काॕलेजच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती !

प्रकाशन: 09 Mar 2023 10:14 PM
वाचन संख्या 85

मालवण/सहिष्णू पंडित उपसंपाद गुरूवार दि.९ मार्च या दिवशी व्हीक्टर डान्टस लाॕ काॕलेजच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एका अभिनव उपक्रमातून वराड येथील नागरिकांमध्ये कायदेविषयक जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन आणि मोफत सल्लाशिबिराचेही आयोजन केले.
येथील ग्रामपंचायतीत दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने शिबिराचा आरंभ झाला.वराड ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांचे स्वागत व सन्मान काॕलेजचे तज्ज्ञ सल्लागार श्री.तायशेट्येसर यांनी केला.अॕड.रूपेश परूळेकर ,श्री.म्हालटकरसर व श्री.डान्टस सर यांच्या मार्गदर्शनाखाली काॕलेजच्या विद्यार्थ्यांनी गावक-यांना पुढीलप्रमाणे माहिती दिली.

अथर्व कुंटे – ७/१२ संबंधातील मुद्देपूजा पटेल – मातापित्यांचा संरक्षण अधिकार आणि त्याचबरोबर पोटगी विषयक माहितीकाजल पेडणेकर -अपंग व विकलांग व्यक्तींसाठीचे अधिकारअर्जुन गावडे – माहितीचा अधिकार मेधा परब – वृद्ध कल्याणकारी कायदे नव निवृत्ती वेतन योजनासिद्धी सामंत -घरगुती हिंसाचार कायदाअवधूत सामंत – ग्राहक संरक्षण कायदाश्री.संग्राम गावडे – ग्रामपंचायत कायदात्या नंतर अॕड रूपेश परूळेकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सेक्रेटरी श्री म्हालटकर साहेब यांनी मार्गदर्शन केले.ग्रामस्थांच्या शंका व प्रश्नांचे समाधान श्री तायशेट्ये सर यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यता मसुरकर हिने केले.याचवेळी काॕलेजचे माजी विद्यार्थी अॕड सुशांत कुबल उपस्थित होते.श्री,डान्टस सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स