ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग किल्ला ते भरतगड किल्ला महिला सक्षमीकरण पायी मशाल फेरी!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग किल्ला ते भरतगड किल्ला महिला सक्षमीकरण पायी मशाल फेरी!

प्रकाशन: 09 Mar 2023 04:55 PM
वाचन संख्या 57

सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभागामार्फत आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत महिला दिन  अनोख्या पद्धतीने  मसुरे गावामध्ये साजरा झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि  त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये मोठा फायदा होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त एनसीसी क्षेत्राकडे वळावे. यापुढेही मर्डे ग्रामपंचायत च्या वतीने एनसीसी विद्यार्थ्यांना जे सहकार्य लाभेल ते दिले जाईल. सिंधुदुर्ग कॉलेजचा हा उपक्रम सर्व जिल्ह्याला आदर्श असा आहे असे प्रतिपादन मर्डे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुरकर यांनी मसुरे येथे बोलताना केले.स. का  पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यापासून भरतगड किल्ल्यापर्यंत महिला सक्षमीकरण मशाल पेटवून १८ किलोमीटर अंतर मशाल घेऊन चालत पूर्ण करण्यात आले.सकाळी सिंधुदुर्ग किल्ला बंदर जेटी वर प्राचार्य  ज्योती तोरस्कर , योगा ग्रुप  अनुष्का चव्हाण या महिलांच्या हस्ते मशाली प्रज्वलित करून डॉ शिवराम ठाकूर, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ट्रेकिंग कॅम्प उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य ठाकूर सर व कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी चंद्रशेखर कूशे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर १८ किलोमीटर अंतर चालून पूर्ण केल्यानंतर मर्डे ग्रामपंचायत सरपंच संदीप हडकर, ग्रामसेवक शंकर कोळसुलकर,मंडळ अधिकारी सुहास चव्हाण, तलाठी रविराज शेजवळ, कोतवाल श्रीकांत खोत, प्रतीक्षा परब, सचिन चव्हाण, बांदिवडे ग्रामपंचायत कर्मचारी  महेश हडकर, मर्डे ग्रामपंचायत लिपिक महेश खोत, सुदर्शन मसुरकर, विनोद मोरे, शैलेश मसुरकर, श्री कमलेश ठाकूर, माजी सरपंच  लक्ष्मी पेडणेकर,कॉलेजचा जीएस ओंकार यादव, सुरज शिवगणया सर्वांनी या ट्रेकिंग कॅम्प व मशालीचे स्वागत केले.   या नंतर किल्ले भरतगड येथे ट्रेकिंग कॅम्पची सांगता झाली. या कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा डॉ एम. आर. खोत, एनसीसी सीनियर नारायण मुंबरकर, प्रीती बांदल, तेजस पोळ, मिथिल मोरवेकर, तृप्ती माडिये, सिद्धी कुमठेकर, अर्जुन मालवणकर, बिरू खरात यांनी केले.लेफ्टनंट प्रा  डॉ.खोत सर यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मिलिटरी, तटरक्षक दल पोलीस भरती ,एअर फोर्स ,नेव्ही रिलायन्स उद्योग, महाराष्ट्र कॅडेट फोर्स, पेरॅमिलीटरी व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यामध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात तसेच प्रथम प्राधान्य दिले जाते असे आपल्या मनोगतात सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स