व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल, जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
बांदा /राकेश परब: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा प्रशालेत आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ,मदर तेरेसा ,इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांनी दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले ,मदर तेरेसा ,इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले .प्रशालेच्या विद्यार्थिनी कुमारी कृपा वारंग ,श्रेया हळदणकर यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले .प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, जिजामाता ,मदर तेरेसा ,ऍनी बेझंट ,आनंदीबाई जोशी, लता मंगेशकर, प्रतिभाताई पाटील, सानिया मिर्झा ,यांसारख्या करूतृत्ववान स्त्रियांच्या वेशभूषा केल्या व त्यांच्या विषयी माहिती सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिशा रॉड्रिक्स यांनी विशेष मेहनत घेतली अशा प्रकारे नाबर प्रशालेत महिला दिन मोठ्या उत्साहात साजचॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नंबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा प्रशालेत बुधवार दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)