महान येथे महिलांसाठी विविध स्पर्धा!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील महान ग्रामपंचायत येथे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे यावेळी सरपंच अक्षय अजय तावडे यांनी सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.संगीत खुर्ची मध्ये प्रथम कविता दिगंबर शिंदे,द्वितीय क्र.समिक्षा संजय हळवे, तृतीय क्र. प्रियांका शिवाजी गावडे.स्मरणशक्ती स्पर्धाप्रथम क्र. ऋता चव्हाण,व्दितीय क्र.सुकन्या परब,तृतीय क्र.शिल्पा सावंत.मेणबत्ती पेटविणे स्पर्धाप्रथम क्र. प्रतिज्ञा हळवे,द्वितीय क्र. समिक्षा हळवे,तृतीय क्र. सई शिंदे सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. सरपंच अक्षय तावडे, उपसरपंच अजित राणे, ग्रामसेवक सागर देसाई, स्वाती घाडी, श्रद्धा हळवे, तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. ग्रामसेवक सागर देसाई यांनी आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)