ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिक्षिका स्वाती पाटील यांना नवदुर्गा विजयोत्सव सन्मान पुरस्कार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिक्षिका स्वाती पाटील यांना नवदुर्गा विजयोत्सव सन्मान पुरस्कार

प्रकाशन: 08 Mar 2023 09:32 PM
वाचन संख्या 52

बांदा/राकेश परब: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव सन्मान पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील कास नं.१शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. स्वाती पाटील यांना देण्यात आला.

कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या३२ गुणवंत महिलांच्या अलौकिक कार्याप्रती हे पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी साहित्यिका व ज्येष्ठ विचारवंत सुजाता पेंडसे,जर्नालिस्ट फौंडेशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षा मनीषाताई लोहार, जर्नालिस्ट फौंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार आदि मान्यवर उपस्थित होते.

स्वाती पाटील या मुळच्या कोल्हापूर चंदगड शिवनगे येथील असून गेली १७ वर्षे त्या सावंतवाडी तालुक्यात शिक्षक म्हणून सेवा करत असून त्यांनी यापूर्वी निगुडे व सध्या कास नं.१ शाळेत कार्यरत असून शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनवले आहे तसेच लोकसहभागातून शाळेचा विविध भौतिक गरजा पूर्ण केल्या असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यकरत असून उमेद फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य करत आहेत. स्वाती पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स