ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिडवणे ग्रामपंचायतची शैक्षणिक ग्रामसभा संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिडवणे ग्रामपंचायतची शैक्षणिक ग्रामसभा संपन्न

प्रकाशन: 07 Mar 2023 01:48 PM
वाचन संख्या 215

ब्यूरो चिफ-विवेक परब : निपुण भारत अभियान अंतर्गत शिडवणे ग्रामपंचायतच्यावतीने शिडवणे नं. १ शाळेत शैक्षणिक ग्रामसभा संपन्न झाली.

प्रारंभी सर्व उपस्थित पदाधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामसेवक नलावडे यांनी प्रास्ताविक केले. शाळापूर्व शिक्षण, अंगणवाडीतील वातावरण, शैक्षणिक सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेची शैक्षणिक सद्यस्थिती, इयत्तावार अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्तीबाबत शिडवणे नं.१ शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे व शिडवणे कोनेवाडीचे उपशिक्षक मंगेश खांबळकर यांनी माहिती दिली. शाळेचा शैक्षणिक विकास आराखडा व भौतिक विकास आराखडा इत्यादी माहिती सांगण्यात आली. शाळेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आवश्यक सहाय्याविषयी चर्चा करण्यात आली.निपुण भारत अभियानाकडून अपेक्षा व माहिती देण्यात आली. सरपंच रविंद्र शेट्ये यांनी शैक्षणिक ग्रामसभेला मार्गदर्शन केले.

बालसभा व पालकसभेत मुलांनी केलेल्या मागण्यांची यादी वाचून दाखवण्यात आली.

त्यावेळी शिडवणे गावचे सरपंच रविंद्र शेट्ये, उपसरपंच दिपक पाटणकर, ग्रामसेवक नलावडे, ग्रामपंचायत सदस्य कोमल शेट्ये, दयानंद कुडतरकर, शांताराम धुमाळ, सुप्रिया पांचाळ, सुप्रिया पाष्टे, स्मिता टक्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ, उपाध्यक्षा समिता सुतार, समीर कुडतरकर, सचिन टक्के, प्रेरणा कासार्डेकर, मंजुळा गुंडये, तारीफ शेख, आशा सेविका आरती शिंदे, अंगणवाडी सेविका पाटणकर, लवेश कासार्डेकर, सेजल भोवड, समृद्धी पाटणकर, चिन्मय पाटणकर, उपशिक्षिका सुजाता कुडतरकर, सीमा वरुणकर, पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल आणि शिडवणे गावातील बहुसंख्य पालक, ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स