ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिंदे भाजप सरकारकडून रक्त  पिशव्यांच्या दरात ४५० वरून ११०० रुपयांची  वाढ
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिंदे भाजप सरकारकडून रक्त पिशव्यांच्या दरात ४५० वरून ११०० रुपयांची वाढ

प्रकाशन: 06 Mar 2023 05:57 PM
वाचन संख्या 31

रक्त विकाऊ सरकारच्या विरोधात लवकरच सिंधुदुर्ग युवासेना करणार आंदोलन-युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा

ब्यूरो चिफ- विवेक परब- शिंदे भाजप सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकीय रक्त पेढ्यांमार्फत केल्या जाणाऱ्या रक्त पुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.केद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत निश्चित केलेल्या दरानुसार राज्यातील रक्त पुरवठ्याचे दर निश्चित केले आहेत. या दारामध्ये मोठी तफावत असून ठाकरे सरकारच्या काळात शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशविचा दर ४५० होता तोच दर आता ११०० रु.करण्यात आला आहे.तर अशासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशविचा दर १५५० रु करण्यात आला आहे. त्याचबरोबर रेड सेल, फ्रेश फ्रोझेन प्लास्मा व इतर रक्तघटकांचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. केंद्रातील भाजप सरकार जीवनावश्यक सर्वच गोष्टींचे दर वाढवीत असून गॅस, पेट्रोल, डीझेल,कडधान्य, लाईट बिल याचे दर भरमसाठ वाढवण्यात आले आहेत.केंद्रातील भाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत आता राज्यातील शिंदे भाजप सरकारने देखील लोकांचा जीव वाचवणाऱ्या रक्त पिशव्यांच्या पूर्वीच्या दरात ६५० रु वाढ करून आता रक्त पिशवी ११०० रु ला मिळणार आहे. ज्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती नसेल त्याला वाढीव दराचे रक्त उपलब्ध करता न आल्यास रक्ताअभावी रुग्णाला जीव गमवावा लागणार आहे. त्यामुळे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या रक्त विकाऊ शिंदे भाजप सरकारचा सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना जाहीर निषेध करत असून लवकरच या दरवाढी विरोधात युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स