ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
भारतीय सुराज्य संस्थेतर्फे मडुरा माऊली मंदिर परिसरात श्रमदान
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भारतीय सुराज्य संस्थेतर्फे मडुरा माऊली मंदिर परिसरात श्रमदान

प्रकाशन: 04 Mar 2023 11:54 PM
वाचन संख्या 40

बांदा / राकेश परब :  भारतीय सुराज्य संस्था शाखा सावंतवाडीच्या वतीने मडुरा माऊली मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागी झाले होते. मडुरा देवस्थान समिती व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.     

    कन्नूर येथील श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज यांनी सन १९९३ मध्ये भारतीय सुराज्य संस्थेची स्थापना केली. अध्यात्म बरोबरच सामाजिक जीवनामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने ही संस्था संस्थापित करण्यात आली. सद्गुरू गणपतराव महाराज यांनी घालून दिलेल्या अष्टप्रतिज्ञे नुसार संस्थेचे कार्य चालते. मुख्य समिती व सल्लागार समितीच्या निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी श्रमदान राबविण्यात येते. तसेच आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, मोफत औषधे यासारखे अनेक सामाजिक कार्यक्रम संस्था आयोजित करते. रोनापाल येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी दोन  स्वतंत्र वसतिगृह भारतीय सुराज्य संस्थेच्या प्रयत्नाने आणि एम फॉर सेवा या संस्थेच्या सौजन्याने उभारण्यात आली आहेत. तसेच मडूरा पंचक्रोशीतील होतकरू मुलांसाठी गणवेश वाटप व मडूरा हायस्कूल मधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी बक्षीसे वितरण करण्यात येत असल्याची माहिती सत्संग प्रमुख गणेश नाईक यांनी यावेळी दिली.     

सदर श्रमदानात गणेश नाईक, संस्थेचे तालुकाध्यक्ष दिनेश नाईक, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, उपाध्यक्ष प्रवीण नाईक, दिपू परब, सचिव जितेंद्र नाईक, प्रसाद गावडे, प्रियांका गावडे, कार्याध्यक्ष विनोद नाईक, अमित नाईक, सहचिटणीस राजेश नाईक, खजिनदार सर्वेश प्रभू, किशोर देऊलकर, अनुप नाईक, गजानन नाईक, कौशल नाईक, बाळकृष्ण प्रभू, प्रदिप नाईक, एकनाथ भोगटे, अशोक कुबल, स्मिता नाईक, माजी सैनिक श्री. गवंडी, कस्तुरी नाईक आदी सहभागी झाले होते. देवस्थान समितीच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली. समिती अध्यक्ष आनंद परब यांनी संस्थेचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स