ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
पाडलोस गाव व्हाट्सएप गृप आयोजित जल्लोष २०२३ कार्यक्रमात केणीवाडा शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले शेतकरी नृत्य
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पाडलोस गाव व्हाट्सएप गृप आयोजित जल्लोष २०२३ कार्यक्रमात केणीवाडा शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले शेतकरी नृत्य

प्रकाशन: 04 Mar 2023 11:57 PM
वाचन संख्या 33

बांदा /राकेश परब पाडलोस गाव व्हाट्सएप गृप आयोजित जल्लोष २०२३ कार्यक्रमात केणीवाडा शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले शेतकरी नृत्य लक्षवेधी ठरले. तसेच शिवजयंती निमित्त ग्रामस्थांसाठी घेण्यात वेगवेगळ्या आलेल्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.व्हाट्सएप गृपच्या माध्यमातून गावात अनेक शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त गावातील महिला व पुरुषांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धा : प्रथम – सायली सूरज गावडे, द्वितीय – साक्षी बापू गावडे, तृतीय – यशदीप अविनाश गावडे. बादलीत बॉल टाकणे : प्रथम – अर्पिता अविनाश गावडे, द्वितीय – कविता काशिनाथ आंबेकर, तृतीय – अनुजा अमेय गावडे. संगीत खुर्ची (महिला)- प्रथम – ललिता अमित पाडलोसकर, द्वितीय – अनुजा अमेय गावडे, तृतीय – शीतल रामा गावडे. संगीत खुर्ची (मुली) प्रथम – अनुष्का अमित पाडलोसकर, द्वितीय – मीनाक्षी अशोक सावंत, तृतीय – अंकिता अनिल गावडे. संगीत खुर्ची (पुरुष) प्रथम – रोहित सुरत गावडे, द्वितीय – विश्राम रामचंद्र गावडे, तृतीय – गंगाराम अर्जुन गावडे यांनी क्रमांक पटकावला. दरम्यान, गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा व्हाट्सएप गृपच्यावतीने सन्मान करण्यात आला. भारतीय पारंपारिक संगीत क्षेत्रात होणाऱ्या जिल्ह्यातील विविध भजन स्पर्धामध्ये यश संपादन करून गावाचे नाव उज्वल केल्याबद्दल श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पाडलोसचा कलागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर देशसेवा हीच ईश्वरसेवा मानून आपल्या कर्मभूमीवर कर्तव्य बजावून एक आदर्श निर्माण करून भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले पाडलोस गावचे सुपुत्र हवालदार निलेश तुकाराम गावडे यांचा अध्यक्ष विश्राम गावडे यांच्या हस्ते देशसेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गावातील महिलांनी नृत्य व तरुणांनी सामाजिक नाट्यप्रयोग सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू शेटकर, शिवराम पाडलोसकर यांनी केले. प्रास्ताविक ग्रुपचे अध्यक्ष विश्राम गावडे यांनी तर आभार प्रकाश करमळकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स