ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
संदीप कदम यांना शिवतरुण मित्रमंडळ तिवरे तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

संदीप कदम यांना शिवतरुण मित्रमंडळ तिवरे तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान!

प्रकाशन: 04 Mar 2023 05:32 PM
वाचन संख्या 28

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीवाडीचे पदवीधर शिक्षक श्री संदीप हरी कदम यांना शिवतरुण मित्र मंडळ तिवरे तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्री.संदीप कदम यांनी विविध उपक्रमांद्वारे शाळेचा नावलौकिक तालुका,जिल्हा, राज्यस्तरापर्यंत पोहोचवलेला आहे. विद्यार्थ्यांचा कवितासंग्रह प्रकाशित करून त्यांनी साहित्य क्षेत्रातील एक नवीन दालन विद्यार्थ्यांसाठी खुलं करून दिलं.या शाळेतील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जैतापूर- रत्नागिरी, वागदे- कणकवली या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात सहभाग घेतला असून प्राविण्यही प्राप्त केले आहे. निबंध,वक्तृत्व,नृत्य, गायन,क्रीडा स्पर्धा,शालेय परसबाग, शिष्यवृत्ती,स्पर्धा परीक्षा,गुणवत्ता अशा विविध क्षेत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले आहे. पुणेरी आवाज या रेडिओ चॅनेलवर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कविता सादर झाल्या आहेत. ज्ञानवेध सारखे हस्तलिखित अविरतपणे सात वर्ष त्यांनी चालू ठेवलेले आहे. प्रकट महाराष्ट्र या साप्ताहिक वृत्तपत्राचा महाराष्ट्र रक्षक हा पुरस्कार शाळेस प्राप्त झालेला आहे.त्यांच्या या सेवाभावी वृत्तीबद्दल ‘शिवतरुण मित्र मंडळातर्फे’ त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. शिवप्रेमी तरुण मंडळाचे श्री. प्रसन्न म्हाडेश्वर,किशोर प्रभूदेसाई, निलेश परब,कवी श्री.संतोष म्हाडेश्वर, शा.व्यव.समिती अध्यक्ष श्री.रामदास आंबेलकर, मुख्याध्यापक विजय शिरसाट व तिवरे गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स