ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
कट्टा येथे गोधडी प्रशिक्षण वर्ग संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कट्टा येथे गोधडी प्रशिक्षण वर्ग संपन्न

प्रकाशन: 04 Mar 2023 05:27 PM
वाचन संख्या 37

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर बै नाथ पै सेवांगण कट्टा येथे गोधडी प्रशिक्षण वर्ग आयोजन करण्यात आले होते. मातृ मंदिर देवरुखच्या तज्ञ मार्गदर्शिका सौ अंजली माळी त्यांच्या सहकारी कु रुपा जोयशी व कु दीपाली जोयशी यांच्या मार्गदर्शना खाली महिलाना प्रशिक्षण दिले दोन दिवस हे प्रशिक्षण संपन्न झाले.गोधडी आणि रजई तयार करून एखादी महिला उदरनिर्वाह करू शकते हेमाळी मॅडम यानी यावेळी संगीतले.उपस्थित सर्व महिलानी अत्यंत आत्मीयतेने व आवडीने या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.गोधडी या बरोबरच पाय पुसणी व बटवा याचंही प्रशिक्षण झालं.समारोप कार्यक्रमात सौ मेस्त्री, सौ सरमळकर, कुमारी चव्हाण यानी आपल्या मनोगतात अत्यंत कुशल प्रशिक्षणाबद्दल माळी मॅडम व सहकार्यांचे आभार मानले. सौ माळी मॅडम यानी प्रशिक्षणार्थी यांच्या शिकण्याच्या आवडीबद्दल आनंद व्यक्त करून गरज पडल्यास आपण पुन्हा प्रशिक्षण घेण्यास तयार असल्याचे नमूद केले.यावेळी आरती कांबळी यानी मनोगत व्यक्त केले.सौ अजली माळी व सहकार्यांचा सेवांगण च्या वतीने स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.प्रशिक्षण वर्गाचे नियोजन सुजाता पावसकर आणि बाळकृष्ण गोंधळी यानी केले.किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, मनोज काळसेकर, आरती कांबळी, सौ मठकर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स