ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
वैभववाडी पंचायत समितीत वर्च्युअल क्लास रूम, वेबसाईटचा जिल्हा परिषद  प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला शुभारंभ
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडी पंचायत समितीत वर्च्युअल क्लास रूम, वेबसाईटचा जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला शुभारंभ

प्रकाशन: 04 Mar 2023 03:08 PM
वाचन संख्या 89

सहसंपादक/नवलराज काळे: वैभववाडी पंचायत समितीच्या व्हर्च्युअल क्लास रूम व वेबसाईटचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते पार पाडला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महिला बालकल्याण जिल्हा अधिकारी श्रीमती काकडे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पंचायत समिती वैभववाडी या ठिकाणी गुरुवारी सत्यनारायण महापूजा पार पडली. या निमित्त विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमालाही प्रजित नायर यांनी हजेरी लावली. रांगोळी स्पर्धा, फणीगेम्स स्पर्धा, पाककला स्पर्धा आदी स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना श्री नायर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दरम्यान शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचा शुभारंभ ही नायर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नायर म्हणाले, प्रशासनात काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी हे एका कुटुंबातील सदस्य आहेत. या कुटुंबात येऊन खूप आनंद झाला. ग्रामीण भागात काम करत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेता आल्या. त्या सर्व अडचणी मार्गी लावणार असे नायर यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स