ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
स्टार्ट युवर क्लास विथ सॉंग : गोविंद वावदाने शेर्पे केंद्रस्तरीय टॅग मिटिंग संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्टार्ट युवर क्लास विथ सॉंग : गोविंद वावदाने शेर्पे केंद्रस्तरीय टॅग मिटिंग संपन्न

प्रकाशन: 04 Mar 2023 03:04 PM
वाचन संख्या 55

ब्यूरो चिफ/विवेक परब- इंग्रजी विषयाची भीती कमी होण्यासाठी वर्गाची सुरुवात शिक्षकांनी इंग्रजीतून करायला हवी. ‘ स्टार्ट युवर क्लास विथ अ सॉंग ‘ असे प्रतिपादन शेर्पे केंद्राचे टॅग समन्वयक तथा कुरंगवणे खैराट शाळेचे पदवीधर शिक्षक गोविंद वावदाने यांनी चिंचवली मधली शाळेत केले.

टॅगची सुरुवात वेलकम सेरेमनीने झाली. त्यावेळी चिंचवली मधली शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभा अकिवाटे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व टॅगसाठी शुभेच्छा दिल्या. अनिल खोत यांनी प्रास्ताविक केले , तर अरुणा वाळवेकर यांनी आभार मानले. शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक व व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून सुरु असलेल्या संकेतस्थळाचा उपयोग करूनही शिक्षकांनी विविध आवश्यक इंग्रजी विषयक प्रशिक्षणे पूर्ण करुन आपले इंग्रजीचे ज्ञान अद्ययावत ठेवावे असे आवाहन करण्यात आले.

इंग्रजी व्हिडीओ दाखवून त्यावर सामूहिक चर्चा झाली. पॉडकास्टचा वापर करुनही शिक्षकांनी इंग्रजीतील उच्चार समजून घ्यावेत. प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन करताना वर्गाची सुरुवात इंग्रजी कवितेने करावी असेही प्रतिपादन टॅग समन्वयक गोविंद वावदाने यांनी केले.

टॅग मिटींगमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सर्व टॅग शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स