ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
Holi 2023 स्पेशल ब्रेकिंग न्यूज कोकणवासीयांसाठी 12 स्पेशल ट्रेन, ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

Holi 2023 स्पेशल ब्रेकिंग न्यूज कोकणवासीयांसाठी 12 स्पेशल ट्रेन, ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु

प्रकाशन: 03 Mar 2023 11:10 PM
वाचन संख्या 122

सहसंपादक /नवलराज काळे: होळी सणानिमित्ताने कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात होळी सणाचा आनंद वेगळाच असतो. या सणानिमित्ताने लाखो कोकणवासी मुंबईहून आपापल्या गावी जातात. कोकणात जवळपास तीन ते चार दिवस होळी सणाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असते. होळी निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करता मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन गाड्यांचा निर्णय घेतला आहे. गावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 12 स्पेशल ट्रेन चालवण्याचं नियोजन केलं आहे. या ट्रेनसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगटी सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे.मध्य रेल्वे प्रशासनाने या गाड्यांची सविस्तर माहिती देण्यासाठी प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धी पत्रकात याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. एकूण 12 गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची देखील गैरसोय टळणार असून प्रशासनाला देखील त्याचा फायदा होणार आहे.मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलंय?मध्य रेल्वे 12 अतिरिक्त होळी स्पेशल ट्रेन चालवणार आहेहोळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/पनवेल आणि सावंतवाडी रोड/रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त 12 विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रत्नागिरी विशेष (3 सेवा)01151 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. 4.3.2023 आणि 07.3.2023 रोजी 00.30 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी 09.00 वाजता पोहोचेल. 01152 विशेष रत्नागिरी येथून दि. 6.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी 13.50 वाजता पोहोचेल.थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.2. पनवेल – रत्नागिरी विशेष (4 सेवा)01153 विशेष गाडी दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी पनवेल येथून 18.20 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी 00.20 वाजता पोहोचेल. 01154 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी 16.20 वाजता पोहोचेल.थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.3. पनवेल – सावंतवाडी रोड विशेष (4 सेवा)01155 विशेष गाडी पनवेल येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी 18.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. 01156 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी 07.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.20 वाजता पनवेल येथे पोहोचेल.थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.4. रत्नागिरी- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे विशेष01158 स्पेशल रत्नागिरी येथून 9.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. थांबे: संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे.या सर्व विशेष गाड्यांची संरचना: 18 शयनयान , 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनआरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे बुकिंग तात्काळ उघडण्यात आले आहे.थांब्यांच्या वेळेच्या तपशीलासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स