ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
जिल्हास्तरीय ज्ञानी मी होणार स्पर्धेत मसुरे केंद्रशाळा  प्रथम !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हास्तरीय ज्ञानी मी होणार स्पर्धेत मसुरे केंद्रशाळा प्रथम !

प्रकाशन: 03 Mar 2023 04:33 PM
वाचन संख्या 52

मसुरे प्राजक्ता पेडणेकर : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात मोठ्या गटातील ज्ञानी मी होणार या स्पर्धेमध्ये केंद्रशाळा मसुरे नं.१ च्या विध्यर्थिनी कु. श्रेया प्रदीप मगर व कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शालेय अभ्यासक्रम, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यावर आधारित असणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना घवघवीत यश मिळविले. त्यांना सौ‌. रामेश्वरी मगर, गोपाळ गावडे, शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, विनोद सातार्डेकर, उमेश खराबी यांनी मार्गदर्शन केले. विजेतेपदाच्या करंडकासह सुवर्ण पदक, प्रशस्तिपत्र देऊन शिक्षणाधिकारी श्री. महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी श्री. शोभराज शेर्लेकर, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, विस्तार अधिकारी सौ. परब, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख यांनी त्यांचा गौरव केला. यशा बद्दल गुणवंत विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स