ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
तुतारी एक्सप्रेस ला नांदगाव स्टेशनवर थांबा मिळण्यासाठी रेल रोको तुर्तास स्थगित
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तुतारी एक्सप्रेस ला नांदगाव स्टेशनवर थांबा मिळण्यासाठी रेल रोको तुर्तास स्थगित

प्रकाशन: 03 Mar 2023 07:17 PM
वाचन संख्या 39

प्रवासी संघटनेचे संतोष राणे यांची माहिती

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दखल घेत केली रेल्वे मंत्र्यांशी चर्चा

सहसंपादक नवलराज काळे:- नांदगाव पंचक्रोशीतील सर्वांना जवळ असलेले नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे तुतारी रेल्वेला थांबा मिळण्यासाठी छेडण्यात येणारे रेल रोको आंदोलन तूर्तास स्थगिती केल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटने चे वाघेरी माजी सरपंच संतोष राणे यांनी दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला असून, फोन द्वारे चर्चा देखील केली आहे. नांदगाव दशक्रोशी मधील ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेत आठ दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. नांदगांव रेल्वे स्टेशन या ठिकाणी मागील कोरोना काळापासून तुतारी रेल्वे ला थांबा बंद केलेला आहे. वारंवार संबंधित विभागांना व मंत्री यांना विनंती करूनही अद्याप पर्यंत रेल्वे थांब्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी रेल रोको करण्याकरिता नियोजन बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत रेल रोको साठी दिवस निश्चित करण्यात आला. व त्यानुसार नियोजन पूर्ण झाले होते अशी माहिती वाघेरी माजी सरपंच संतोष राणे यांनी दिली. दरम्यान या मागणीची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दखल घेतल्याने तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र याबाबत येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास पुन्हा संबंधित प्रशासनाला निवेदन देत आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील श्री संतोष राणे यांनी दिला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स