ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
साळशी सोसायटीच्या वतीने ४ मार्च रोजी साळशी येथील श्री भवानी सभागृहात कर्जविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साळशी सोसायटीच्या वतीने ४ मार्च रोजी साळशी येथील श्री भवानी सभागृहात कर्जविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

प्रकाशन: 03 Mar 2023 04:26 PM
वाचन संख्या 143

संतोष साळसकर | सहसंपादक: देवगड तालुक्यातील साळशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, साळशी संस्थेच्या शेतकरी सभासदांसाठी कर्ज विषयक व संस्था विकासात्मक मार्गदर्शन करण्यासाठी शनिवार दि. ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता येथील श्री भवानी सभागृह ( माळवदे हॉल ) याठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घघाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हाध्यक्ष मनीष दळवी आणि देवगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संघाचे संचालक अॅड. प्रकाश बोडस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवगड तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे अध्यक्ष अॅड. अजितराव गोगटे, संचालक सुभाष नार्वेकर, संतोष फाटक, राजू शेटये, शैलेश जाधव, साळशी सरपंच सौ. वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सभासदांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संस्था चेअरमन व विद्यमान संचालक साळशी वि. का. स. सेवा सोसायटी मर्यादित, साळशी यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स