ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख पदी आ.रविंद्र फाटक पक्ष मजबुती साठी प्रयत्नशील राहणार आम. रवींद्र फाटक
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख पदी आ.रविंद्र फाटक पक्ष मजबुती साठी प्रयत्नशील राहणार आम. रवींद्र फाटक

प्रकाशन: 02 Mar 2023 11:26 PM
वाचन संख्या 40

सहसंपादक नवलराज काळे : सिंधुदुर्ग रत्नागिरी शिवसेना पालघर लोकसभा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख पदी आ. रविंद्र फाटक यांची निवड शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो अभेद्य ठेवण्यासाठी पुढील काळात काम केलं जाईल. सत्तेच्या माध्यमातून कोकणात सर्वांगीण विकास साधला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत अशी संघटना उभारण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना आ.रविंद्र फाटक यांनी दिली आहे. शिवसेना आ.रवींद्र फाटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून कोकणात दांडगा लोकसंपर्क त्यांचा आहे. अनेक वर्ष शिवसेना पक्षात काम करत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगले नेटवर्क उभे केकेलं आहे. त्याचा उपयोग करून आगामी काळात शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांच्यावर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आ.रवींद्र फाटक यांनी २००९ मध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.त्यावेळी किरकोळ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा असलेला आगामी काळात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी मदत होणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स