ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
कासार्डे विकास मंडळ, मुंबईची नूतन कार्यकारिणी जाहीर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कासार्डे विकास मंडळ, मुंबईची नूतन कार्यकारिणी जाहीर

प्रकाशन: 02 Mar 2023 10:26 PM
वाचन संख्या 34

परशुराम माईनकर यांची अध्यक्ष म्हणून फेर निवड तर सरचिटणीसपदी रोहिदास नकाशे यांची वर्णी

संतोष साळसकर | सहसंपादक: कासार्डे विकास मंडळ मुंबई ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून मंडळाच्या अध्यक्षपदी परशुराम सखाराम माईनकर यांची बहुमतांनी फेर निवड करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी रोहिदास दत्तात्रेय नकाशे यांची वर्णी लागली आहे.वाडी सभासद तसेच पदाधिकारी सभा मुंबई येथे संपन्न झाली, या सभेत ही नुतन कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली.

कासार्डे विकास मंडळ मुंबई, संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे मोठ्या दिमाखात कार्यरत आहे. जिल्ह्यामध्ये कासार्डे शिक्षण संस्थेने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे शैक्षणिक क्षेत्रात विशेष नावलौकिक मिळविला आहे. जिल्ह्यात आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून काही मोजक्याच शैक्षणिक संस्था गणल्या जातात त्यामध्ये कासार्डे विकास मंडळ, मुंबई या संस्थेचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते.अशा शैक्षणिक संस्थेची सन.२०२३ ते सन.२०२७ च्या नुतन कार्यकारिणीत विविध क्षेत्रातील अतिशय अभ्यासू सभासदांची मंडळाचे पदाधिकारी म्हणून बहुमताने निवड करण्यात आली आहे.*कासार्डे विकास मंडळ, मुंबई ची नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -**अध्यक्ष-* परशुराम सखाराम माईनकर, *उपाध्यक्ष -* गणेश पांडुरंग शेट्ये, दीपक बाळा पाताडे,ॲड. मिलिंद अर्जुन नकाशे*सरचिटणीस -* रोहिदास दत्तात्रेय नकाशे,*सहाय्यक चिटणीस* -सीताराम पांडुरंग कोकाटे, जयदीप बापूसाहेब खाड्ये, आनंद लक्ष्मण कासार्डेकर व प्रल्हाद देवजी पाताडे,*खजिनदार -* पंढरीनाथ बाबुराव राणे,*सह खजिनदार-* दयानंद दिनकर जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर *कार्यकारीणी सदस्य म्हणून* बापू गणपत बंड,विलास बाळकृष्ण लाड, गजानन शांताराम शेट्ये,नंदकिशोर नाना तावडे,प्रकाश गोविंद खांडेकर,रवींद्र सीताराम पाताडे, अशोक पांडुरंग सावंत, मनोज दत्ताराम शेलार,जगन्नाथ भिकाजी पाताडे, आनंद बाळाराम राणे आदींची बिनविरोध निवड झाली आहे. या नुतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन केले जात आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स