ताज्या बातम्या
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडीजोड रस्त्यांना 40 कोटीचा निधी द्या – आमदार नितेश राणे यांची अधिवेशनात मागणी
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडीजोड रस्त्यांना 40 कोटीचा निधी द्या – आमदार नितेश राणे यांची अधिवेशनात मागणी

प्रकाशन: 02 Mar 2023 10:30 PM
वाचन संख्या 53

सहसंपादक /नवलराज काळे- सिंधुदुर्ग वाडीजोड रस्त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 40 कोटीचा निधी द्या. अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आ. राणे यांच्या मागणीनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वाडीजोड रस्त्यासाठी लवकरच निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कणकवली, देवगड व वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी कोकणातील प्रलंबित विकास कामाबाबत अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले. मागील सात महिन्यात विविध विकास कामांसाठी सरकारने निधी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ही केले. शिंदे – फडणवीस सरकारने मागील सात महिन्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकास कामासाठी भरघोस निधी दिला आहे.केंद्र शासनाने तर तरळे – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाला तब्बल 250 कोटीचा निधी दिला आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणार आहे. केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले.पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, मंत्री महोदय हे कोकणातीलच आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाडीजोड रस्त्याच्या अनेक अडचणी कोकणवासीयांना भेडसावत आहेत. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून वाडीजोड रस्त्यासाठी 40 कोटीचा निधी मिळावा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात केली. मागील अडीच वर्ष सत्तेवर असलेल्या सरकारने सातत्याने कोकणावर अन्याय केला. विकास कामाला निधी दिला नाही. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.वाडीजोड रस्ता प्रश्नाला उत्तर देताना सिंधुदुर्गचे पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स