ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
देवगड महाविद्यालयाच्या NCC विभागाची JUO रेणुका विलास राणे हिची अग्नीवीर GD (महिला मिलिटरी पोलीस) मध्ये निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवगड महाविद्यालयाच्या NCC विभागाची JUO रेणुका विलास राणे हिची अग्नीवीर GD (महिला मिलिटरी पोलीस) मध्ये निवड.

प्रकाशन: 02 Mar 2023 10:21 PM
वाचन संख्या 36

ब्यूरो चिफ-विवेक परब- देवगड महाविद्यालयाची M.Sc. भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थिनी, NCC cadet JUO रेणुका विलास राणे हिची अग्निवीर GD (महिला मिलिटरी पोलीस) करिता निवड झाली आहे. चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. शालेय शिक्षणाबरोबर, NCC आणि क्रीडा क्षेत्रातील तिच्या यशामुळे तिने महाविद्यालयाचे नाव वेळोवेळी विविध स्तरावर उंचावले आहे. रेणुका हिचे इ.११वी पासूनचे शिक्षण देवगड महाविद्यालयामधे झाले. तिने २०२२ मध्ये भौतिकशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केली तसेच त्याच वर्षी झालेल्या नॅशनल ग्रॅज्युएट फिजिक्स एक्झाम (NGPE) मध्ये राज्य पातळीवर सर्वोत्तम १०% विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. यंदाच्या वर्षी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातून M.Sc. करत असताना मुंबई विद्यापीठ पातळीवर उंच उडी क्रीडाप्रकारात तिने कांस्य पदक मिळविले होते. महाविद्यालयाच्या कला, क्रीडा, NCC, शैक्षणिक अशा सर्व उपक्रमांमध्ये तिचा सहभाग असायचा. यातून आत्मविश्वास वृध्दिंगत होऊन व्यक्तिमत्व विकास झाला तसेच, महाविद्यालयातील करियर मार्गदर्शन इत्यादीचा लाभ तिला झाला. प्रशस्त मैदान, जिमखाना, ग्रंथालय आणि वाचनगृह अशा महाविद्यालयातील सुविधांचा तिने सर्वांगीण प्रगतीकरिता प्रभावीपणे वापर केला. ५८ महाराष्ट्र बटालियन NCC सिंधुदुर्गच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य देखील तिच्या या यशामध्ये मोलाचे आहे.देवगड महाविद्यालय आणि कॉलेज NCC UNIT ला तिचा अभिमान आहे. महाविद्यालयातील NCC अधिकारी लेफ्ट. डॉ. सुनेत्रा ढेरे, प्रा. प्रसाद मालवणकर, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माने, प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे यांनी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी यांच्याकडून रेणुकाचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स