ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
न्हावेली-रेवटेवाडी येथील काजू बागेत शॉर्टसर्किट होऊन सुमारे एक एकर काजू बागेला भीषण आग
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

न्हावेली-रेवटेवाडी येथील काजू बागेत शॉर्टसर्किट होऊन सुमारे एक एकर काजू बागेला भीषण आग

प्रकाशन: 02 Mar 2023 03:47 PM
वाचन संख्या 38

बांदा /राकेश परब : न्हावेली-रेवटेवाडी येथील काजू बागेत विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन सुमारे एक एकर वरील काजू बागेला आग लागली. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठी आर्थिक हानी टळली. वीज प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही विद्युत खांब व जीर्णवाहिन्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळेच असा प्रकार घडल्याचा आरोप काजू बागायतदार प्रसाद हळदणकर यांनी केला. रेवटेवाडी येथील शशिकांत हळदणकर यांच्या काजू बागेस दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोट लांबून दिसल्यामुळे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर परिसरात विद्युत खांब व जीर्ण वाहिन्या वीज वितरणच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष झाला. त्यामुळेच आपल्या बागायतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात सुमारे वीस ते पंचवीस झाडे जळाली असून 50 हजारांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने आमचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी व झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काजू बागायतदार शेतकरी प्रसाद हळदणकर यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स