ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
अपघातग्रस्त शालेय विद्यार्थ्याला रोणापालवासियांचा मदतीचा हात
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अपघातग्रस्त शालेय विद्यार्थ्याला रोणापालवासियांचा मदतीचा हात

प्रकाशन: 02 Mar 2023 09:49 PM
वाचन संख्या 72

बांदा /राकेश परब : बांदा येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेला रोणापाल येथील सुरज गोठस्कर या शालेय विद्यार्थ्याला रोणापाल वासियांनी आर्थिक मदतीचा हात दिला. सुरजच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सागरची घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने रोणापाल गावातील ग्रामस्थ व तरुण वर्गाने पुढाकार घेत उपचारासाठी आर्थिक मदत दिली. रोणापाल वासियांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.    

रोणापाल येथील सूरज गोठस्कर या शालेय विद्यार्थ्याचा आठ दिवसांपूर्वी बांदा येथे दुचाकीवरुन अपघात झाला होता. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. मात्र, गोठस्कर कुटुंबियांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने गावातील ग्रामस्थांनी हॉस्पिटलचा अर्धा खर्च करण्याचा निर्धार केला.  

  रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्यासोबत ग्रामस्थांनी सावंतवाडी येथे हॉस्पिटलमध्ये सूरजची भेट घेतली. हॉस्पिटलचा अर्धा खर्च देण्याच्या आश्वासना प्रमाणे प्रकाश गावडे आणि अन्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही मदत सुपूर्द करण्यात आली.     

     यासाठी प्रकाश गावडे, परशुराम गावडे, सुदिन गावडे, राजन परब, नंदकिशोर नेमन, किरण नाईक, एकनाथ भोगटे, सीताराम गावडे, मंगेश गावडे, नरेंद्र कानडे, बाबल तूयेकर, अंकुश काका, दिपक परब, नारायण नाईक, तानाजी धरणे, वामन गावडे, नाना कुडव, प्रशांत प्रमोद गावडे, नवलु कोळापटे, निलेश नाईक, संतोष कोळापटे, सुशांत गावडे, विष्णू तोरस्कर, राजाराम भोगटे, सचिन कुबल यांनी सहकार्य केले. गोठस्कर कुटुंबियांकडून सर्वांचे आभार मानण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स