गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा समारोप
ब्यूरो चिफ-विवेक परब- आजगाव येथील गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पाचवीसाठीच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा सांगता कार्यक्रम आजगाव मराठी शाळेत नुकताच पार पडला. सदर कार्यक्रम प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर व शाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. सौ. जाधव यांनी सुरुवातीला प्रतिष्ठान च्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.गेले पावणे तीन महिन्यांत केलेल्या १२६ तासाच्या या मार्गदर्शन वर्गात भाग घेतलेल्या या चौदा विद्यार्थ्यांना गणेशप्रसाद गोगटे पुरस्कृत प्रमाणपत्रे देण्यात आली. या दरम्यान घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत यश संपादन केलेल्या गंधार गवंडे, मानसी पांचाळ, तनवी पांढरे, साहिल भागीत, प्रभाकर मोरजकर, आयान शेख आणि खुशी जाधव या सात मुलांना दीपक प्रभू पुरस्कृत अठराशे रुपयाची अठरा बक्षीसे आणि उत्कर्ष पांढरे, दिया सावंत, वैभव पांढरे, हर्षदा आरोलकर आणि विष्णू कळसुलकर याना देण्यात येणारी श्याम धाकोरकर पुरस्कृत दोनशे पन्नास रुपयाची पाच बक्षीसे मुख्याध्यापिका जाधव यांचे जवळ सुपूर्द करण्यात आली. प्रमोद नाईक यानी भेट दिलेल्या पुस्तिकाही सर्व मुलांना भेट दिल्या. यावेळेस प्रतिष्ठानच्या वतीने गिरीश बेहेरे व महेंद्र प्रभू उपस्थित होते. त्यांनी या विनामूल्य शैक्षणिक कार्याची महती विषद केली. पालकांच्या वतीने अनिता पांचाळ, शहानूर शेख, रुची आरोलकर आणि गंधाली मोरजकर उपस्थित होत्या. शेवटी शाळेतील मुलांसाठी इंग्लिश ग्रामर व सायन्सचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा मनोदय विनय सौदागर यानी आपल्या मनोगतात व्यक्त केला,तसेच मार्गदर्शन वर्गा दरम्यान अल्पोपहार पुरस्कृत केलेल्या माधुरी काकतकर, संजय पंडीत, श्याम तेंडोलकर, वंदना साळगावकर, हेमंत प्रभू आणि गौरी नातू यांचे ऋण व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार शिक्षक दत्तगुरू कांबळी यांनी मानले, तर कार्यक्रमासाठी शिक्षक निंगोजी कोकीतकर व रुपाली नाईक आणि स्वयंसेविका गौरी आरोलकर यांचे सहाय्य लाभले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)