चिंदर डाळपस्वारीला उत्साहात प्रारंभ
ब्यूरो चिफ/विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावच्या दुसऱ्या टप्प्यातील डाळपस्वारीला आज बुधवारी प्रारंभ झाला. सकाळी ११ नंतर श्रींची डाळपस्वारी भगवती मंदिरातून बारापाच वतनदार, मानकरी तसेच जनसागरासह ढोल -ताशासह वाजत गाजत, हरहर महादेवच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली. डाळपस्वारी आज सडेवाडी ब्राह्यण मंदिर, सिध्देश्वर मठ, येथून दुपारी पिसाळी ब्राह्मणदेव मंदिर तेरईवाडी, संध्याकाळी तेरई ब्राम्हण येथे विश्रांती घेऊन, उद्या २ मार्चला संध्याकाळी भगवंतगड किल्ला येथील सिध्देशश्वराचे दर्शन घेऊन रेडेचाळा, लब्देब्राम्हण, कोळकर ब्राह्मण, केळब्राम्हण यांची भेट घेऊन रात्री गांगेश्वर मंदिर पोहोचणार आहे. ४ मार्चला संध्याकाळी डाळपस्वारी गावडेपुरूष मंदिर, विनायक प्रभू, भावई ब्राह्मण, श्री दत्त मंदिर येथून सातेरी मंदिर(गावठणवाडी) येथे रात्री उशीरा पोहोचणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)