ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कट्टा येथे 'ताणतणाव व्यवस्थापन आणि आरोग्य' प्रबोधनात्मक उपक्रम!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कट्टा येथे 'ताणतणाव व्यवस्थापन आणि आरोग्य' प्रबोधनात्मक उपक्रम!

प्रकाशन: 01 Mar 2023 03:44 PM
वाचन संख्या 48

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे जागतिक महिला दिन पार्श्वभूमीवर ‘ताणतणाव व्यवस्थापन आणि आरोग्य’ हा आगळा वेगळा विशेष उपक्रम राबविण्यात आला. जीवनात अनेक वेळा ताण तणाव निर्माण होत असतात. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. तणावमुक्त जीवन जगणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन मालवण पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी संजय गोसावी यांनी यावेळी केले. यावेळी सरपंच श्री शेखर पेणकर, उपसरपंच धोंडी कामतेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ मयुरी कुबल, सौ.गिरकर, श्रद्धा गुराम, सौ.सुप्रिया गुराम, सौ.संपदा वालावलकर, तलाठी सौ.नारकर, ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी कार्यक्षेत्रातील महिला बचत गटाचे अध्यक्ष, सदस्य, सीआर पी, आशा सेविका, गावातील महिला भगिंनी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत भोजणे, संकेत परूळेकर,विराज गोठणकर, केंद्र चालक सोनाली भोजणे उपस्थित होते.उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ काढून पाच महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.या भेटवस्तू सरपंच श्री शेखर पेणकर यांनी दिल्या.तसेच या सोबत कृषी विस्तार अधिकारी संजय गोसावी यांनी सुध्दा पाच महिलांना भेटवस्तू दिल्या.सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक श्री लक्ष्मण धोंडी सरमळकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स