ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
नेरूर-वाघोसेवाडी येथे तालुकास्तरीय 'लगोरी' स्पर्धेचे सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर व ओ.बी.सी. सेल जिल्हाप्रमुख श्री. रूपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन..!!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नेरूर-वाघोसेवाडी येथे तालुकास्तरीय 'लगोरी' स्पर्धेचे सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर व ओ.बी.सी. सेल जिल्हाप्रमुख श्री. रूपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन..!!

प्रकाशन: 01 Mar 2023 03:55 PM
वाचन संख्या 66

नेरूर-वाघोसेवासियांकडून विस्मृतीत गेलेल्या पारंपारिक खेळांना उर्जितावस्था मिळवून देण्याचा प्रयत्न..!!

नेरूर । देवेंद्र गावडे (उपसंपादक) :-नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ परस्कृत आणि जि.प.प्राथ.श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी शाळा आयोजित तालुकास्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलनाने व श्रीफळ वाढवून माननीय सरपंच सौ.भक्ती घाडीगावकर आणि माननीय श्री .रुपेशजी पावसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री.वेतुरेकर, र्श्री.काका गावडे,उपसरपंच श्री.दत्ताजी म्हाळदळकर,ग्राम.पं.सदस्य प्रवीणजी नेरूरकर,ग्राम.पं.सदस्य मंजुनाथजी फडके,ग्राम.पं.सदस्य श्री .संतोषजी कुडाळकर,ग्राम.पं.सदस्य श्री.पपु नारींग्रेकर,ग्राम.पं.सदस्य शंभु नाईक,श्री.सतीश सांवत,सामाजिक कार्यकर्ते श्री.अजित मार्गी,माजी सरपंच श्री.शेखरजी गावडे,श्री .रविंद्र गावडे,वाघोसेवाडी शाळा मुख्याधापक श्री.प्रसादजी कुंटे ,सहशिक्षिका.सौ.पूर्वा गावडे बाई,मुख्य पंच श्री.अमृत काणेकर,उपपंच,श्री.विश्वास पवार,सहपंच श्री.अश्विन मांजरेकर,श्री.राजा शृंगारे,श्री.विराज परब ,ग्रामस्थ, उपस्थित संघ शिक्षकवर्ग व सर्व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.या स्पर्धेत नऊ शाळा व अकरा संघानी सहभाग घेतला होता.यास्पर्धेत विजेता संघ हा जि.प.प्राथ.सराफदारवाडी शाळा ब संघ ठरला.तर उपविजेता संघ जि.प.प्राथ.गोंधयाळे शाळा संघ ठरला तर तृतीय विजेता संघ हा जि.प.प्राथ.शाळा आंबडपाल हा संघ ठरला.विजेत्या संघाना व सहभागी संघाना पंचाच्या हस्ते चषक व प्रमाणप्रत्र देऊन गौरवण्यात आले.यास्पर्धेसाठी मैदानाची व्यवस्था ही श्री.शशिकांत नेरुरकर ,मयुर आडेलकर,निखिल परब,जतिन राऊळ,श्री संतोष कुडाळकर,राहूल परब,यांनी केली . अल्पोपहार व जेवण व्यवस्था हीश्री.शेखरजी गावडे व श्री संतोष कुडाळकर यांनी केली तर सर्व हे प्रवीण नेरुरकर यांनी दिले.तर प्रमाणप्रत्र ही राजा शृंगारे यांनी दिली.या स्पर्धेसाठी इतर मदत ही श्री.रुपेशजी पावसकर यांनी केली.तर या स्पर्धेचे सुत्रसंचालन सौ.पुर्वा गावडे बाई आणि आभार हे श्री प्रसाद कुंटे गुरुजीनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स