ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अनिष्ट प्रथा परंपरांची बंधने झुगारत स्त्रियांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे - सरिता पवार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अनिष्ट प्रथा परंपरांची बंधने झुगारत स्त्रियांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे - सरिता पवार

प्रकाशन: 28 Feb 2023 11:14 PM
वाचन संख्या 50

संतोष साळसकर | शिरगांव: स्त्रीयांचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवं.आपल्या धर्म संस्कृतीनी लादलेली आणि पिढीजात जपलेली, सर्व अनिष्ठ चालिरितीची बंधने झुगारून स्त्रियांनी आपल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे. आणि आपल्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे यावे असे आवाहन कणकवली येथील राष्ट्र सेवा दलाच्या सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री सरिता पवार यांनी केले. राजापूर तालुक्यातील जुवाठी येथे विधवा महिलांना सोबत घेऊन पहिल्यांदाच हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. जुवाठी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ व सौ. मालती गोंडाळ यांनी आपली आई कै. सौ. सावित्री केरू गोंडाळ यांच्या स्मरणार्थ जुवाठी ग्रामपंचायत सभागृहात, संपूर्ण गावातील महिलांसाठी सामुहिरित्या हळदीकुंकू व महिलांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी सरिता पवार यांनी आपले विचार मांडले.

पूर्वापार परंपरेने चालत आलेल्या अनेक प्रथा, महिलांसाठी जाचक आहेत. यामध्ये पतिनिधनानंतर विधवा होणाऱ्या महिलांची समाजात अगदी अत्यंत वाईट पध्दतीने होणारी अवहेलना, त्यांना जगणं नकोशी करणारी असते. त्याच पध्दतीत मासिकपाळीच्या काळात त्यांना आपल्याच हक्काच्या घरातून त्या चार दिवसांत कसे वाळीत टाकले जाते याचे वास्तव दर्शन, या हळदीकुंकू कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सुमारे २०० महिलांसमोर पवार यांनी मांडले. आणि त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या कडून होकार -नकार घेत त्यांच्या दू: खाना वाट मोकळी करून दिली. त्या पुढे म्हणाल्या.. बी. के. गोंडाळ यांनी, विधवा मातांची आजच्या प्रगतीच्या काळात होणारी अवहेलना याबाबतचे कृतीशील प्रबोधनाचे उचललेले पाऊल धाडसी व क्रांतीकारी आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. कारण त्यांनी याबाबत आपल्या वैयक्तिकस्तरावर कृती कार्यक्रमाची आखणी केली. आपल्या मृत्यूपश्चात आपल्या पत्नीच्या अंगावरील दागदागिने काढू नयेत, कुंकू पूसू नये याबाबतचे राजापूर तहसीलदार कार्यालयात पाहिले प्रतिज्ञापत्र लिहून दिले. त्यानंतर आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त जुवाठी गावातील १५ विधवा मातांचा, साडी चोळी देवून प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स