ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शालेय गीत गायन स्पर्धेत गौरी वस्त, स्वरा आणि आर्या आचरेकर प्रथम!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शालेय गीत गायन स्पर्धेत गौरी वस्त, स्वरा आणि आर्या आचरेकर प्रथम!

प्रकाशन: 28 Feb 2023 09:53 PM
वाचन संख्या 71

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर १च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बेस्ट- हनुमान व्यायाम शाळा कांदळगाव यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणारी प्रतिष्ठेची कै.दिनकरराव दौलतराव राणे (सुभेदार)स्मृती तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धा २०२३ कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे संपन्न झाली. सुप्रसिद्ध मराठी संगीत नाटककार कै. विद्याधर गोखले जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या या अठराव्या तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये एकूण ४६ विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. गट क्रमांक 1 इयत्ता पहिली ते चौथी या गटात प्रथम कु. गौरी राजन वस्त, (मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा मालवण), द्वितीय क्रमांक कु. दूर्वा नंदकिशोर राणे, (भंडारी एज्युकेशन सोसायटीज हायस्कूल प्राथमिक शाळा), तृतीय क्रमांक कु. मीरा संजय वराडकर आणि उत्तेजनार्थ कु. प्रांजल सतीश तेरसे (मोहनराव परूळेकर प्राथमिक शाळा मालवण). गट क्रमांक 2 इयत्ता पाचवी ते सातवी या गटात प्रथम क्रमांक कु. स्वरा अनिरुद्ध आचरेकर, (न्यू इंग्लिश स्कूल आचरे), द्वितीय क्रमांक कु. सारा सचिन शारबिद्रे, (जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण), तृतीय क्रमांक कुमार तन्मय रामचंद्र मेस्त्री, (प्राथ. शाळा मसुरे देऊळवाडा) आणि उत्तेजनार्थ चैतन्य भगवान भोगले (केंद्र शाळा मसुरे नं.1), गट क्रमांक 3 इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांक कु. आर्या अनिरुद्ध आचरेकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरे), द्वितीय क्रमांक कुमार पारस मंदार सांबारी (कावले इंग्लिश मिडीयम स्कूल आचरे), तृतीय क्रमांक कु. भूमी आशिष नाबर( इंग्लिश स्कूल आचरे) आणि उत्तेजनार्थ कु.श्रेया श्रीकृष्ण गावडे, (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण). यशस्वी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रकमेचे पारितोषीक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर स्पर्धेचे पुरस्कर्ते श्री नंदकुमार दिनकरराव राणे, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत रमाकांत पारकर, सचिव श्री पांडुरंग कृष्णा राणे, उपाध्यक्ष श्री. सत्यवान परब,श्री. सुधाकर राणे, ओझर विद्या मंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी एस परब, कांदळगाव सरपंच श्री. रणजित परब, स्पर्धेचे परीक्षक म्हणून लाभलेले कुडाळ येथील संगीत अलंकार श्री प्रफुल्ल रेवंडकर, बेस्ट शिव- हनुमान व्यायामशाळा कांदळगावचे अध्यक्ष श्री. उमेश दिनकर कोदे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती इजाबेल फर्नांडीस आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा कांदळगाव नंबर 1 ची शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ आणि ग्रामपंचायत कांदळगाव यांचे बहुमोल सहकार्य लाभले. संगीत साथ आदर्श संगीत विद्यालयाचे संचालक श्री. मंगेश कदम, श्री. वैभव मांजरेकर, श्री. विजय बोवलेकर, विनोद सातार्डेकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रवीण पारकर यांनी केले. सौ. अर्चना उमेश कोदे, श्रीराम परब, आशिष आचरेकर यांनी सहकार्य केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स