<em>मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथील जेष्ठ साहित्यिक अजित राऊळ यांचा भाजपच्या वतीने सत्कार</em>
संतोष साळसकर | सहसंपादक
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी राजभाषा दिन” म्हणून साजरा केला जातो.. मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने जेष्ठ साहित्यिक अजीत राऊळ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ नेते रामकृष्ण उर्फ बाळा सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नोकरीच्या निमित्ताने मुंबईत असताना त्यांनी “साहित्य दरवळ मंच” या संस्थेची स्थापना केली व कविसंमेलने, अभिवाचन, दिवाळी अंक प्रदर्शन व पुरस्कार, साहित्यिकांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा. सुभाष भेंडे, डॉ. विजया वाड, डॉ. तुलसी बेहरे, नलेश पाटील, अशोक बागवे, साहेबराव ठाणगे, अरुण म्हात्रे, कवी सौमित्र अशा दिग्गज साहित्यिकांना आमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानांचे व कविसंमेलनाचे आयोजन केले.
महानगरपालिकेच्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित अजीत राऊळ यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असुन प्रासंगिक व स्फुट विषयावरील लेखन प्रसिद्ध आहे. विद्या व वाडःमय या विषयांना वाहिलेल्या विद्यादर्पण या त्रैमासिकाचे संपादन व प्रकाशन ते करीत असून सेवानिवृत्ती नंतर ते वेंगुर्ले येथील आनंदयात्री वाड:मय मंडळात उस्ताहाने कार्यरत असतात अश्या जेष्ठ साहित्यिकांना गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस, ता. सरचिटणीस प्रशांत खानोलकर, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नाडिस, सांस्कृतिक सेलचे शैलेश जामदार, प्रकाश नांदोसकर, महादेव केरकर इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)