माध्यमिक विद्यामंदिर साळशी चा -इ.10 वी विद्यार्थ्यी शुभेच्छा शुभचिंतन समारंभ -2023 - उत्साह व आनंदी वातावरणात संपन्न
संतोष साळसकर | शिरगांव : देवगड तालुक्यातील साळशी विद्यामंदिर येथील इयत्ता 10 वी मार्च-2023 च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी २५ फेब्रु. रोजी “शुभेच्छा समारंभ” आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन सत्यवान सावंत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माईन सरपंच सौ.नितिषा पाडावे, संस्था उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर , संस्था सदस्य -मंगेश साळसकर, संतोष साळसकर, मुख्याध्यापक माणिक वंजारे, मंजुषा साळसकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, संतोष ठुकरुल, प्रकाश रावले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
सर्व प्रथम इ.10 वी-बॅच सन-2022 व http://localhost/news/public/uploads/2023 च्या बॅच कडून व माणिक वंजारे-मुख्याध्यापक, संजय मराठे, पुरुषोत्तम साटम,इ.या शिक्षकांकडून देणगी दाखल मदत दिलेल्या रक्कमेतून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर नवीन लोखंडी गेट बसवले ,त्याचे उद्घघाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्य कार्यक्रमाचे उद्घघाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, सरस्वती पूजनाने झाले.नंतर ईशस्तवन, स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक माणिक वंजारे व उपशिक्षक संजय मराठे यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
यानंतर इ.8 वी व 9 वी च्या अनेक विद्यार्थ्यांनी 10 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देणारी सुंदर मनोगते व्यक्त केली.यानंतर इ.10 वी च्या काजल घाडी,मानसी लाड,रिया भोगले,इ.विद्यार्थिनींनी आपल्या शाळे व शिक्षकांविषयी च्या आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.त्यातून त्यांचे शाळेविषयीचे प्रेम दिसत होते.
नंतर शिक्षकांतून स्वप्नील भरणकर पुरुषोत्तम साटम , संजय मराठे , मोरे यांनी ही आपल्या मनोगतातून शुभेच्छा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी मनोगते व्यक्त केली.
मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी ही इ.10 वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन करणारे विचार अनेक उदाहरणे देत व्यक्त केले . संस्था सदस्य व पालकांमधून प्रभाकर साळसकर, मंगेश साळसकर, राजेंद्र साटम यांनी विद्यार्थ्यांना मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या मध्ये शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यामध्ये काजल घाडी -10 वी-प्रथम,सुमन लब्धे-9 वी- द्वितीय,सिध्दमयी साळसकर -9 वी- तृतीय क्रमांक , उत्तेजनार्थ -केतकी साळसकर व श्रेयश भोगले -8 वी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी माईन सरपंच सौ.नितिषा पाडावे,व कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यवान सावंत-चेअरमन- स्कूल कमिटी यांनी ही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक- माणिक वंजारे यांच्या वतीने पुरुषोत्तम साटम यांनी -मुख्य प्रवेशद्वाराच्या लोखंडी गेट साठी देणगी दाखल आर्थिक मदत केलेल्या 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे आभार मानण्यात आले.
शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाच्या बहारदार सुत्रसंचालनाने सुमन लब्धे-इ.9 वी,या विद्यार्थ्यीनीने सर्व उपस्थितांची मने जिंकली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)