ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हिंदू राष्ट्र जागृती सभेचे ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी येथे ४ मार्चला  आयोजन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हिंदू राष्ट्र जागृती सभेचे ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी येथे ४ मार्चला आयोजन...!

प्रकाशन: 26 Feb 2023 10:28 AM
वाचन संख्या 82

ब्यूरो चिफ/विवेक परब: भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहेत; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय अथवा आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण केले जाते. मग मशिदी चर्च यांचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे हे सर्व पहाता भारतात खरोखरच धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) व्यवस्था अस्तित्वात आहे का? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद, भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट म्हणजे ‘हलाल जिहाद यांसारख्या हिंदूवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदूच्या प्रभावी संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ मार्च २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात हिंदु राष्ट्र जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्य करत आहे. आज भारतातील २८ राज्ये आणि जगभरातील अनेक देशांमध्ये समितीचे कार्य सुरु आहे. अशा प्रभावीपणे कार्यरत असणाऱ्या हिंदु जनजागृती समितीची ही सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. ही धर्मप्रेमी हिंदूंसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाइये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाड्ये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक श्री. नीलेश सांगोलकर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत या सभेचा मालवण, कणकवली. देवगड या तालुक्यातून प्रसार चालू आहे. गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका (कॉर्नर मिटिंग), भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, होर्डिंग, सामाजिक माध्यमे यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत. या सभेच्या प्रचारासाठी २७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सकाळी १०.३० वाजता आचरा येथे भव्य वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या वाहनफेरीचा प्रारंभ श्री देव रामेश्वर मंदिर आचरा येथून होणार असून आचरा तिठा, बाजारपेठ, हिर्लेवाडी, वायंगणी, श्री स्वामी समर्थ मठ, आचरा हायस्कूल मार्गे आचरा तिठा आल्यावर सांगता होणार आहे. या फेरीसह ४ मार्च २०२३ या दिवशी होणाऱ्या हिंदु राष्ट्र जागृती सभेसाठी हिंदूनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन हिंदु जनजागृती समिती कडून करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स