श्री देवी माऊली पंचायतन,रोणापाल मंदिराचा वर्धापन दिन १ मार्च ला
बांदा/राकेश परब : श्री देवी माऊली पंचायतन वर्धापन दिनानिमित्त श्री देवी माऊली मंदिर रोणापाल येथे दि. १ मार्च रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापुजा, महाप्रसाद व रात्री ८ वाजता श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल यांच्या वतीने आयोजित श्री दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्व भाविक व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती, ग्रामस्थ व मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)