ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खांबाळे येथे संगणकावर आधारित संपूर्ण बॉडी चेकअप व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खांबाळे येथे संगणकावर आधारित संपूर्ण बॉडी चेकअप व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न.

प्रकाशन: 25 Feb 2023 10:51 PM
वाचन संख्या 24

मंगेश लोके मित्रमंडळाचे आयोजन

शिवसेना तालुकाप्रमूख मंगेश लोके, सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची प्रमुख उपस्थिती

सहसंपादक नवलराज काळे:-
सध्या धावपळीच्या जीवनात बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे आहाराकडे दुर्लक्ष होवून विविध आजारांना आपण कसे निमंत्रण देत आहोत. त्यामुळे आपण नीट काळजी घेतली पाहिजे. पिस्टमय पदार्थयुक्त आहार सेवन केल्यावर चरबीचे प्रमाण वाढत आहे. शरीराला पोषक असणारेच आहार आपण घेतले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. मनोज पाटील यांनी केले. मंगेश लोके मित्रमंडळ खांबाळे आयोजित आरोग्यविषयक शिबीर प्रसंगी बोलत होते. एम.पी. डेलिनीड मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कराड संचलित डी.एन.एम.आयुर्वेदिक केअर सेंटर, कोल्हापूर चे डॉ. मनोज पाटील यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या संगणकावर आधारित संपूर्ण बॉडी चेकअप व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिरात एकूण 65 शिबिरार्थीनी सहभाग नोंदवत समाधान व्यक्त करत मंगेश लोके मित्रमंडळाचे आभार व्यक्त केले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सिनेनाट्य दिग्दर्शक दीपक कदम, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, उपसरपंच गणेश पवार यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी सुकुमार भोसले, माजी चेअरमन सुनिल पवार, गुरुनाथ गुरव,अभिकांत रावराणे,नारायण धुळप, दिनेश पालकर,रामदास पवार, नारायण पाटील, माजी उपसरपंच सत्यवान पवार आदी उपस्थित होते. मंगेश सूद, ग्रामपंचायत शिपाई नंदू पवार, पाणी कर्मचारी अंबाजी पवार यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. प्रस्तावना व आभार सिनेनाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स