मडुरा, रोणापाल व इन्सुली मंदिर व परिसरात बांदा पोलीसांनी गस्त वाढवण्याची मागणी
सदरच्या परिसरातील मंदिरामधील फंडपेटी फोडल्याने गस्त वाढवण्याची बांदा पोलीसांकडे मागणी
बांदा / राकेश परब : मडुरा, रोणापाल व इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. इन्सुली व रोणापाल मंदिरात चोरी करताना दोघे युवक चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. तिनही ठिकाणी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. बांदा पोलीसात चोरीबाबत फिर्याद नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सांगितले.
काल सायंकाळी उशिरा रोणापाल तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश गावडे यांनी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची भेट घेत बांदा परिसरातील गावामध्ये रात्रौ उशिरा व पहाटेच्या वेळी गस्त वाढवण्यासाठी मागणी केली. सदरच्या अशा प्रकारच्या चो-या रात्रौ उशीर कींवा पहाटेच्या वेळी विशेषतः होत असतात. त्यामुळे या वेळी बांदा पोलीसांनी गस्त घालावी अशी चर्चा करण्यात आली. तसेच गावामध्ये फेरीवाले फीरत आहेत यांची नोंद व त्याच्यावर बांदा पोलीसांनी करडी नजर ठेवावी असे सुचवण्यात आले.
रोणापाल मंदिरात फंडपेटीच नसल्याने चोरट्यांना याठिकाणी काहीच गवसले नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.म्हणून याबद्दल तोडे फार कळू शकले तरी बांदा पोलीसांनी रात्री च्या वेळेत गस्त वाढवण्यासाठी मागणी होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)